Home Blog

सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्‍यांवर कलम १७७ अंतर्गत दाखल होणार गुन्हा

0

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना आळा घालण्यासाठी आणि परिसरातील स्वच्छता राखण्यासाठी उच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक ठिकणी नागरिक मोठ्या प्रमाणात थूंकून घाण करत आहेत. सार्वजनिक ठिकाणी थूंकल्यामुळे रोगराई पसरण्याचा मोठा धोका असतो. सार्वजिनिक ठिकाणी थुंकल्यास आता थेट मुंबई पोलीस गुन्हा दाखल करुन कारवाई करणार आहेत. उच्च न्यायालयाने तसे निर्देश मुंबई पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे आता थुंकिबहाद्दरांच्या चांगल्याच मुसक्या आवळल्या जाण्याची शक्यता आहे.

उच्च न्यायालयात दिनांक ०७/०४/२०२१ रोजी याचिकाकर्ती नामे अरमीन वांद्रेवाला यांनी महाराष्ट्र्‌ राज्य व इतर यांचे विरुध्द दाखल केलेल्या जनहित याचिका क्रमांक ९५००/२०२१ अन्वये मा. उच्च न्यायालयाने बृहन्मुंबई पोलीस दलास दिलेल्या निर्देशागुसार बिनतारी संदेशद्वारे बृहन्मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना आदेशित करण्यात आलेले आहे. की, ज्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक मोठया प्रमाणावर थुंकून घाण करतात अशा ठिकाणांची माहिती प्राप्त करुन सदर नागरिकांवर कलम ११७ महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९६० अन्वये कारवाई करण्यात यावी तसेच सार्वजनिक ठिकाणी अथवा रस्त्यावर थुंकणार्‍या इसमांना जागृत करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी पोलीस वाहनाच्या ध्वनीक्षेपकावरुन किंवा मेगा फोनव्दारे थुंकल्याचे होणारे दुष्परिणामाबाबत माहिती देऊन जनजागृती करावी. पोलीसांना या मोहिमेकरिता मदत करणाऱ्या इसमांना प्रोत्साहित करण्यात येत असून त्यांना योज्य ते संरक्षण दिले जाईल असे सादर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

कोरोना पार्श्वभूमीवर पीएम मोदी यांची महत्वाची बैठक,लॉकडाऊनबाबत निर्णय होणार?

0

देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या संसर्गाचे कहर पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थोड्याच वेळात महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहेत. कोरोनाची वाढती प्रकरणे लक्षात घेता गेल्या अनेक दिवसांपासून सरकार लॉकडाऊनची मागणी करत आहे. बैठकीतील लॉकडाऊनबाबत पंतप्रधान मोदी निर्णय घेऊ शकतात. या बैठकीत सर्व राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहू शकतात.

दिल्लीत आजपासून आठवडाभर कर्फ्यू ,कडक निर्बंध लागू

कोरोना विषाणूच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत पुन्हा एकदा लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. दिल्लीत आठवडाभराचा लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल औपचारिक घोषणा करतील.हे कडक निर्बंध आज रात्री ते 26 एप्रिल पर्यत असेल. दिल्लीतील कोरोना संकटामुळे परिस्थिती बेकाबू झाली आहे. दिल्लीतील बर्‍याच हॉस्पिटलमध्ये बेड नाही, तर त्यांना ऑक्सिजनही मिळत नाही. याच कारणास्तव, आता दिल्लीत हा कठोर निर्णय घ्यावा लागत आहे .तसेच ऑक्सिजन आणि रेमेडसवीरच्या कमतरतेबाबत दिल्ली सरकारने कारवाई केली आहे. एक नियंत्रण कक्ष तयार केले जात आहे, ज्या अंतर्गत पुरवठा डेटा ठेवला जाईल. यासाठी सरकारने नोडल ऑफिसर नेमला आहे.

प्रसिद्ध निर्मात्या अन दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन 

प्रसिद्ध दिग्दर्शक व समाज अभ्यासक सुमित्रा भावे (वय ७८) यांचे सोमवारी सकाळी पुण्यात खासगी रुग्णालयात निधन झाले. त्या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. सुमित्रा भावे यांच्या निधनामुळं पुण्यातील, तसेच महाराष्ट्रातील सांस्कृतिक-सामाजिक विश्वावर शोककळा पसरली आहे. पठडीबाहेरची वाट चोखाळणाऱ्या एका प्रतिभावंत दिग्दर्शिकेला गमावल्याची भावना सिनेसृष्टीत व्यक्त होत आहे.सुमित्रा भावे यांनी दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांच्यासह अनेक उत्तमोत्तम मराठी चित्रपटांची निर्मिती केली. ‘बाई’, ‘पाणी’ या सुरुवातीच्या लघुपटांना लोकप्रियता मिळाल्यानंतर त्यांनी १९९५ मध्ये ‘दोघी’ हा पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट तयार केला. त्यांचे चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत नावाजले गेले; तर अनेक चित्रपटांना राज्य व राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले. ‘विचित्र निर्मिती’ या बॅनरखाली तयार झालेल्या, विविध सामाजिक प्रश्न हाताळणाऱ्या त्यांच्या चित्रपटांचा चाहतावर्ग मोठा आहे.

मुंबईतील 6 रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता! 168 कोरोना रुग्ण सुरक्षित ठिकाणी हलवले 

कोविड बाधित रुग्णांची संख्या संपूर्ण देशात वाढली आहे. त्यामुळे रुग्णांना प्राणवायू (ऑक्सिजन) पुरवठा करण्याची गरज मोठ्या प्रमाणावर निर्माण झालीय. बृहमुंबई महानगरपालिका 6 रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता पडल्याने 168 रुग्णांना प्राणवायू उपलब्ध असलेल्या इतर कोविड रुग्णालय किंवा कोविड केंद्रांमध्ये सुरक्षितरित्या स्थलांतरीत करण्यात आलेय. प्राणवायू पुरवठा सुरळीत राहण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडूनही प्रयत्न सुरु आहेत
दरम्यान, मुंबई महानगरपालिका हद्दीतील सर्व 24 प्रशासकीय विभागात प्राणवायू पुरवठा सुरळीत राखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी अन्न व औषध प्रशासन तसेच प्राणवायू उत्पादक आणि संबंधित सहायक आयुक्त यांच्यासमवेत समन्वय साधण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने 6 समन्वय अधिकारी नुकतेच नियुक्त करण्यात आले. हे समन्वय अधिकारी 24×7 या स्वरुपात कार्यरत राहणार आहेत. यामुळे प्राणवायू पुरवठ्याबाबतची अडचण लागलीच निकाली निघण्यास मोलाची मदत होत आहे.

मुंबई-नाशिक हायवे वरील सॅनिटाईझर कंपनीमध्ये भीषण आग

आसनगाव: आज सोमवारी रात्री 12 वाजताच्या सुमारास   मुंबई-नाशिक हायवे जवळील परिवार हॉटेलच्या मागच्या बाजूस एअरसेल सॅनिटाईझर कंपनीमध्ये भीषण आग लागली आहे. सदर घटनास्थळी कल्याण अग्निशमन केंद्राचे खाजगी २ वॉटर टँकर उपस्थित असून अग्निशमन दलाच्या जवानांनकडून आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. सदर घटनास्थळी मदतीची आवश्यकता असल्याने सदर घटनास्थळी रात्री ०२:४९  वा. सुमारास ठाणे अ. दलातील बाळकूम वरून 1 फायर ब्रिगेडची गाडी रवाना झाली आहे.आग लागल्याचे कारण अद्याप समोर आले नाही.जीवित किंवा वित्त हानी झाल्याची कुठलीही माहिती समोर आलेली नाही.

भाजप आमदार संजय कुटे दारु पिऊन पडलेले असतात, आमदार संजय गायकवाड यांचा बोचक टोला 

शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी संजय कुटे यांना खुले आव्हान दिले आहे. म्हणाले ‘ आ कुटे सारखा तीनपाट आमदार जो दिवसभर दारु पिऊन वावरात पडलेला असतो. अरे हरामखोर पुतळे काय जाळतो, जर हिंमत असेल तर माझ्या जवळ येऊन दाखव. मग मी काय आहे ते दाखवतो, असे खुले आवाहन शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केले. ते बुलडाण्यात बोलत होते. यावेळी संजय गायकवाड यांनी अत्यंत शेलक्या शब्दांत भाजप आमदार संजय कुटे यांच्यावर टीका केली. वाढता कोरोना, केंद्र सरकारने न केलेली मदत, ऑक्सिजनचा तुटवडा यावर मी एक व्हिडीओ बनवला होता. त्यावर भाजपकडून माझा पुतळ्याची जाळपोळ करण्यात आली. पण माझा यात काय दोष आहे? मी फक्त यावरची वस्तूस्थिती मांडली. केंद्राने मदत करायला हवी, ऑक्सिजन द्यायला हवा, रेमडेसिव्हीर दिलं पाहिजे. मात्र राज्यात आज फक्त शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. राष्ट्रवादी-काँग्रेसचे सरकार आहे. म्हणून केंद्र हे पुरवत नाही.
सर्व भारतातील लोक एका पक्षातील आहेत का? यात सर्व धर्मातील सर्व पक्षातील लोक आहेत. मग या राज्यात केवळ मुख्यमंत्री आपला नाही, म्हणून अडवणूक करता. पाकिस्तान, बांगलादेश यांना पुरवता. पण भारताला पुरवत नाही. उत्तरप्रदेशात तुम्ही रेमडेसिव्हीर फुकट वाटता. पण महाराष्ट्राला जनतेला तुम्ही मरणाच्या दारात सोडत असाल तर मी जी भावना मांडली ती चुकीची आहे का? असा सवाल संजय गायकवाड यांनी केला आहे.

‘महाराष्ट्रातील सैनिकी स्थापत्य’, ‘कोकणातील कातळशिल्पे’ या प्रस्तावांचा युनेस्कोकडून तत्वत: स्वीकार


युनेस्कोतर्फे जागतिक पातळीवर जनजागृतीसाठी दरवर्षी 18 एप्रिल हा जागतिक वारसा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो, या वर्षी ‘जटिल भूतकाळ आणि विविधतापूर्ण भविष्य’ ही संकल्पना पुढे ठेऊन हा दिवस साजरा होत आहे. याच पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्य विभाग यांच्यामार्फत भारतीय पुरातत्व सर्वेक्षणामार्फत सादर करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्रातील सैनिकी स्थापत्य’ ‘कोकणातील कातळशिल्पे’ या प्रस्तावांचा युनेस्कोने तत्वत: स्वीकार केला आहे. ही बाब भारतासह अवघ्या महाराष्ट्रासाठी अत्यंत आनंदाची आहे, असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.श्री. देशमुख म्हणाले, कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम साजरा करायला बंधने आली आहेत. जागतिक वारसा स्थळांसाठी युनेस्कोकडून नामांकन मिळवण्यास महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. याचा विस्तृत प्रस्ताव पुरातत्व व वास्तुसंग्रहालये संचालनालायमार्फत व इनटॅक या संस्थेच्या मदतीने तयार करण्यात येणार आहे.
या नामांकन प्रक्रियेत छत्रपती शिवाजी महाराजांचे डोंगरी व समुद्री किल्ले -रायगड, राजगड, शिवनेरी, तोरणा, प्रतापगड, लोहगड, पन्हाळा/ रांगणा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, पद्मदुर्ग, कुलाबा आदी किल्ल्यांचा तसेच कशेळी, बारसू, रुंढेतळी, देवीहसोळ, जांभरुण, अक्षी, कुडोपी या महाराष्ट्रातील तर गोवा राज्यातील फणसईमाळ या कातळशिल्पस्थानांचा समावेश आहे.

महिला व बालविकासमंत्र्यांचा मेळघाटातील दुर्गम गावांत दौरा; महिला वनकर्मचाऱ्यांशी संवाद

0

अमरावती: महिला कर्मचाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा छळ, अन्याय मुळीच सहन करता कामा नये. अन्यायाचा वेळीच प्रतिकार केला पाहिजे. कुठेही गैरप्रकार होत असल्यास वेळीच तक्रार द्यावी. शासन महिला-भगिनींच्या खंबीरपणे पाठीशी उभे आहे, असा संवाद राज्याच्या महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मेळघाटातील महिला वनकर्मचाऱ्यांशी साधला.
मेळघाटातील महिला वनकर्मचाऱ्यांना काम करताना येणाऱ्या अडचणी, वरिष्ठांकडून होणारा जाच याबाबत प्राप्त तक्रारींची दखल घेऊन पालकमंत्र्यांनी मेळघाटातील दुर्गम भागातील विविध ठिकाणी सतत दोन दिवस गोपनीय दौरा केला व महिला वनकर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यांचे मनोबल वाढविले. प्रकल्प अधिकारी मिताली सेठी, उपवनसंरक्षक अविनाशकुमार, नवलकिशोर रेड्डी, पीयुषा जगताप आदी यावेळी उपस्थित होते. महिला व बालविकासमंत्र्यांनी धारणी तालुक्यातील मांगीया, हरिसाल, बोरी, लवादा, चित्री, चिखलदरा तालुक्यातील जैतादेही, मोथा, आमझरी, शहापूर या गावांबरोबरच अकोट वन्यजीव परिक्षेत्रातील धारगड येथेही भेट दिली.

राज्यात कोरोनाचा उद्रेक! 24 तासात आढळले 68631 नवे रुग्ण

राज्यात कोरोना संक्रमणाचा वेग पुन्हा एकदा धडाक्यानं वाढलाय. कोरोना संक्रमणाचे आकडे दररोज एक नवा उच्चांक गाठत नवनवीन रेकॉर्ड कायम करताना दिसतोय. राज्यात आज 68631 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 45654 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 3106828 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 670388 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 80.92% झाले आहे.सध्या देशात १४ लाख ७१ हजार ८७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.आयसीएमआर (ICMR)नं दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत एकूण २६ कोटी २० लाख ०३ हजार ४१५ नमुन्यांची तपासणी करण्यात आलीय.

उल्हासनगरच्या माजी आमदार ज्योती कलानी यांचे निधन

उल्हासनगरच्या माजी आ. ज्योती कलानी यांचे निधन झाले आहे. त्यांचे निधन हार्ट अटॅक मुळे झाली असल्याची माहिती दिली जात आहे. राजकारणात राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणाऱ्या दिग्गजांमध्ये त्यांचे नाव समाविष्ट झाले होते. यानंतर आ. ज्योती कलानी या कट्टर नाईक समर्थक म्हणून ओळखल्या जातात. ज्योती कलानी या राष्ट्रवादीचे माजी आमदार पप्पू कलानी यांच्या पत्नी आहेत. त्यांच्या सूनबाई पंचम कलानी या भाजपच्या तिकीटावर उल्हासनगरच्या महापौरपदी निवडून आल्या होत्या.उल्हासनगरच्या राजकीय वर्तुळात कलानी कुटुंबाचा दबदबा आहे. कलानी कुटुंब हे कोणे एके काळी शरद पवारांचे निकटवर्तीय होते. चार वेळा आमदार राहिलेल्या पप्पू कलानी यांना 2013 मध्ये एका हत्या प्रकरणात कारावास ठोठावण्यात आला. त्यानंतर कलानी कुटुंबाचे पवारांशी असलेले संबंध कमी होत गेले.

मनमोहन सिंग यांचे पीएम मोदींना पत्र, म्हणाले ‘लसीकरणाचा वेग वाढवा’

0

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यापाठोपाठ आता माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रं लिहिलं आहे. कोरोना विरुद्धची लढाई गतीमान करण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवा, अशी मागणी मनमोहन सिंग यांनी या पत्रातून केली आहे.
मनमोहन सिंग यांनी या पत्रातून नरेंद्र मोदी यांचं कोविडमुळे उद्भवलेल्या देशातील समस्यांकडेही लक्ष वेधलं आहे. एकून पाच मुद्द्यांवरून त्यांनी मोदींना सल्लाही दिला आहे. आम्ही किती लसीकरण केलं हे पाहण्यापेक्षा किती लोकसंख्येचं लसीकरण केलं याकडे लक्ष दिलं पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. भारतासहीत संपूर्ण जग गेल्या एक वर्षापासून कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. अनेक आई-वडिलांनी गेल्या वर्षभरापासून आपल्या मुलांना पाहिलेलं नाही. आजी-आजोबांनी आपल्या नातवांना पाहिलेलं नाही. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पाहिलेलं नाही. अनेकांनी आपला रोजगार गमावला आहे. महामारीने लाखो लोकांना गरीबीच्या खाईत ढकललं आहे. पुन्हा कोरोनाची लाट आल्याने लोक भयभीत झाले आहेत. जनजीवन केव्हा सुरळीत होईल? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. कोरोना रोखण्यासाठी आपल्याला बऱ्याच गोष्टी कराव्या लागणार आहेत. मात्र, लसीकरणाचा कार्यक्रम वेगाने वाढवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. माझ्या सूचना तुम्ही अंमलात आणाल याची अपेक्षा आहे, असंही त्यांनी या पत्रात नमूद केलं आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या पश्चिम बंगालमधील प्रचारसभा रद्द 

देशात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. देशात काही राज्यात लॉकडाऊन तर काही राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहे. यामध्ये राहुल गांधी हे  पश्चिम बंगालमधील राहिलेल्या टप्प्यातील जागांसाठीच्या प्रचारसभा घेणार होते मात्र कोरोनाची वस्तुस्थिती लक्षात घेता काँग्रसे नेते राहुल गांधी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी यांनी पश्चिम बंगालमधील राहिलेल्या टप्प्यातील जागांसाठीच्या प्रचारसभा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

राहुल गांधीनी प्रचारसभा रद्द करण्यासोबत इतर पक्षाच्या राजकीय नेत्यांना देखील मोठ्या सभा घेण्यापूर्वी विचार करण्याचं आवाहन केलं आहे.याबाबद त्यांनी ट्विट करत आवाहन सुद्धा केले आहे. म्हणाले ‘पश्चिम बंगालसह देशभरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे मी बंगालमधील माझ्या पुढील सर्व सभा, रोड शो रद्द करत आहेत. कोरोनाची स्थिती पाहता सर्व राजकीय पक्षांनीही मोठ्या सार्वजनिक सभा घेणं टाळाव्यात. कोरोना परिस्थितीचा गांभीर्याने विचार करावा’

SpiceJet च्या प्रवाश्यांना होणार ‘हा’ फायदा, माफ केले अतिरिक्त शुल्क 

0

देशातील सर्वात मोठी देशांतर्गत विमान कंपनी इंडिगो एरलाईन्स नंतर आता बजेट एअरलाइन्स कंपनी स्पाइसजेट प्रवाशांकडून पाच दिवसांपूर्वीच्या तिकिटांच्या तारखांमध्ये किंवा वेळेत बदल करण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारणार नाही. यापूर्वी ही सूट किमान 7 दिवसांपूर्वी झालेल्या फेरबदलासाठी होती. मात्र, आता आणखी दोन दिवस वाढवण्यात आले आहेत.स्पाइसजेटकडून शनिवारी सांगण्यात आले की, नवीन ऑफर अंतर्गत 17 एप्रिल ते 10 मे दरम्यान प्रवासी उड्डाणांसाठी तिकिट बुक करणार्‍या प्रवाशांना एकवेळ बदल शुल्कात सूट मिळू शकते. याद्वारे तारीख आणि वेळेत फक्त एकदाच बदल करता येतो.महाराष्ट्र आणि दिल्लीसारख्या राज्यांमध्ये कोरोना स्थितीबिकट आहे. मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडत असल्याने स्थानिक सरकारांनी संचारबंदी, टाळेबंदी असे निर्बंध लावले आहेत. या पार्श्वभूमीवर लोकांवर तिकीट रद्द करण्याची वेळ येऊ नये. तिकीट रद्द करण्याऐवजी त्यांच्याकडे तारीख आणि वेळेत बदल करण्याचा पर्याय असावा, हा या बदलामागील उद्देश आहे.

जेईई मेन परीक्षा ढकलली पुढे, विद्यार्थ्यांच्या मागणीला यश

यंदाच्या एप्रिल सत्रातील जेईई मेन परीक्षा एप्रिल सत्राची परीक्षा स्थगित करण्यात आली आहे.ही परीक्षेला नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)कडून स्थगिती देण्यात आलीये. नियोजित वेळापत्रकाप्रमाणं जेईई मेन 2021 एप्रिल सत्राची परीक्षा 27 ते 30 एप्रिल 2021 या कालावधीत घेण्यात येणार होती.यानंतर कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढायला सुरवात झाली आहे.त्यामुळे अनेक परीक्षा रद्द तर काही पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत.त्यामुळे जेईई मेन एप्रिल सत्राची परीक्षा 27 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान होणारी परीक्षा लांबणीवर टाकावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनकडून केली जात होती. या जेईई मेनच्या विद्यार्थ्यांकडून #POSTPONEJEEMains2021 ही मोहिम सुद्धा राबवली गेली होती.यामुळे परिस्थितीचा आढावा घेत परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. जेईई मेन परीक्षेची नवीन तारीख नंतर जाहीर केली जाईल, अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली आहे.