अंबानींच्या घराबाहेर पीपीई किटमध्ये सचिन वाझे – एनआयएला

0
31

मुंबई: मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर पीपीई किट घालून आलेली व्यक्ती सचिन वाझेच असल्याची माहिती आता समोर आली आहे. गुप्तवार्ता विभागाच्या (CIU) एका कर्मचाऱ्याने चौकशीदरम्यान NIA ला माहिती दिल्याचे समजते. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून सध्या सचिन वाझे यांच्या CIU युनिटमधील सहकाऱ्यांची कसून चौकशी सुरु आहे. सचिन वाझे यांचे निकटचे सहकारी रियाज काझी यांची सलग तीन दिवस चौकशी झाली आहे.
रियाज काझी यांनीच या कटात वापरण्यात आलेल्या नंबरप्लेट बनवून आणल्याची माहिती मिळतेय.सचिन वाझे हे अंबानी यांच्या घराच्या परिसरात डोक्याला रुमाल बांधून वावरताना दिसल्याचे या वृत्तामध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता सचिन वाझे यांच्याभोवतीचा फास आणखी आवळला जाण्याची शक्यता आहे.एनआयएचे अधिकारी सचिन वाझे यांना पीपीई किट परिधान करुन चालायला लावणार असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाले होते.