अभिनेत्री कंगना रनौतचे ट्विटर हँडल सस्पेंड ,जाणून घ्या कारण… 

0
18

अभिनेत्री कंगना रणावतचे ट्विटर हँडल सस्पेंड करण्यात आले आहे. ट्विटरच्या नियमांचं उल्लंघन करणारी पोस्ट शेअर केल्यामुळे तिच्यावर कारवाई करण्यात आली. बंगाल निवडणूकित TMC च्या निकालानंतर तेथील  हिंसाचारावर कंगनाने ट्वीट केले होते यानंतर या ट्विटमुळे तिच्यावर ही कारवाई करण्यात आली.  निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये कथित हिंसाचारा झाला होता याबद्दल अभिनेत्रींनी ट्वीटच्या करत आक्षेपार्ह भाष्य केले होते.

ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात टीएमसी विजयी झाल्यानंतर कंगनाने पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. अभिनेत्री कंगना रनौतने मायक्रो-ब्लॉगिंग साईटच्या नियमांविरूद्ध मजकूर पोस्ट केल्यानंतर तिचे ट्विटर अकाऊंट निलंबित करण्यात आले आहे.


Leave a Reply