अमेरिकन नौदलाच्या जवानांनी गायलं ‘ये जो देश है तेरा… स्वदेस है मेरा…’;व्हिडिओ व्हायरल 

0
24

भारतात प्रदर्शित झालेल्या स्वदेश यातील ‘ये जो देश है तेरा…’ हे गाणं मोठ्या प्रमाणात गाजलं होतं. दरम्यान, अमेरिकन नौदलाच्या काही कर्मचाऱ्यांनी आपल्या अतिशय सुंदररित्या हे गाणं सादर केलं. सोशल मीडियावर या गाण्याचा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकऱ्यांच्याही हे गाणं पसंतीस उतरत आहे. वॉशिंग्टन येथे नुकतीच अमेरिकन नौदलाचे प्रमुख एम. गिल्डे आणि भारतीय राजदूत तरनजीत सिंग संधू यांची बैठक पार पडली. या कार्यक्रमातील हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एम. गिल्डे यांनी भारतीय राजदूताच्या सन्मानार्थ एका मेजवानीचे आयोजन केले होते. त्यावेळी अमेरिकन नौदलाच्या बँडने आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘स्वदेस’ या चित्रपटाली ‘ये जो देस है तेरा’  हे गाणे सादर केले. हे गाणं ऐकून प्रत्येक भारतीयाच्या अंगावर रोमांच उभे राहतील. अमेरिकन सैनिकांचे गाण्यातील शब्दांचे उच्चार इंग्रजाळलेले असले तरी गाण्यातील राष्ट्रभक्तीचा भाव कुठेही कमी पडताना दिसत नाही.भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला.