अयोध्या दौर्‍यादरम्यान अक्षय कुमारने घेतली मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट

0
31

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने शुक्रवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लखनऊमधील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. अक्षय कुमार आपल्या आगामी राम सेतु या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यासाठी यूपीला आला आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण अयोध्येत होणार आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यापूर्वी अक्षय अयोध्येतही गेला होता. तेथे त्याने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससमवेत रामलल्ला ला भेट दिली आणि पूजा केली.शुक्रवारी या चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्यापूर्वी पूजा आणि विधी केल्या जातील. या पूजेनंतर अक्षय कुमार अयोध्येत श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चम्पत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांची भेट घेतील.