अवकाळी पावसाने डोणगाव – मेहकर रोडवर वाहनांच्या रांगांच रांगा

0
24

नागपुर मुंबई हायवे काल राञीच्या अवकाळी वादळामुळे सुसाट वेगाने वाहणाऱ्या हवेमुळे रोडच्या कडेवरील अनेक झाडे डोणगाव मेहकर परीसरातील रोडवर पडली. अश्या भयंकर परिस्थीतीमुळे डोणगाव मेहकर रोडवर तिनतास जाम लागला होता.या बिकट परीस्थीतीत डोणगाव पोलिस स्टेशन आणि पोलिस मिञ यांनी अथक परीश्रम घेऊन रोड वाहतुकीस खुला केला होता.या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने माञ कुठेही रस्ता मोकळा करण्याची तत्परता दाखवीली नाही.रस्त्याच्या दोन्ही बाजुस पंधरा विस किलोमीटर वाहणांच्या रांगा लागलेल्या होत्या. डोणगाव पोलिसांनी वेळी दक्षता घेतली नसती तर अजुनही रस्ता वाहतुकीस खुला झाला नसता.सुदैवाने यामध्ये कुठेही जिवीत हाणी झाली नाही