अॅस्ट्राझेनकाबाबद तक्रारी, मात्र भारतात कोविशिल्डवर बंदीची शक्यता कमीच! 

0
36

कोरोनावरील उपचारासाठी जगातील अनेक देश अस्त्राझेनेका च्या लसी नागरिकांना देत आहेत. पण ही लस दिल्यानंतर रक्ताच्या गाठी होत असल्याच्या तक्रारी काही देशांमध्ये समोर आल्या आहेत. या तक्रारींबाबत भारत सरकारही गंभीर आहे. देशात AstraZeneca च्या ‘कोविशिल्ड’ लसीबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत बैठक घेतली. पण ‘कोविशिल्ड’ लसवर बंदी घालण्याची कुठलीही शक्यता नाही, असं सूत्रांकडून सांगण्यात येतंय.’कोविशिल्ड’ लसवर बंदी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण ही लस दिल्यानंतर आतापर्यंत रक्ताच्या गाठी झाल्याची कुठलीही तक्रार समोर आलेली नाही. तरीही या मुद्द्यावर एक-दोन दिवसांत AEFI ची बैठक होणार आहे.
कोविशिल्ड लसबाबत कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला शास्त्रीय प्रमाणं तपासून घ्यायची आहेत, असं मंत्रालयातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितलं.जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) AstraZeneca Corona Vaccine सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. तसंच युरोपीय मेडिसिन्स एजन्सीनेही ही लस सुरक्षित असल्याचं स्पष्ट केलं आहे. तरीही जर्मनी, इटली, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल, स्लोव्हानिया आणि लातव्हियाने AstraZeneca च्या लसवर बंदी घातली आहे. युरोप शिवाय इंडोनेशियानेही ही लस वापरण्यावर बंदी घातली आहे.