आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार!

0
28

राज्याचा 2021-22 वर्षाचा अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर केला जाणार आहे. राज्यातील महाविकासआघाडी सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. आज दुपारी दोन वाजता अर्थसंकल्प विधीमंडळात सादर केला जाईल. उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहे. तर वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करतील. यामुळे सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे.
राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी काल संध्याकाळी मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यात आली. ही चर्चा झाल्यानतंर या अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाली. मात्र नुकत्याच सादर झालेल्या आर्थिक पाहणी अहवालातून कोरोनामुळे राज्याची आर्थिक स्थिती खालावल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता फार कमी आहे