आता पेट्रोलची जागा घेईल ‘हे’ इंधन, वाढत्या किंमतीपासून होणार सुटका

0
29

पेट्रोलच्या सतत वाढत्या किंमतींमुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. पेट्रोलच्या वाढत्या किंमतीवर सरकारचं नियंत्रण नसल्याचं वारंवार दिसून आलं. कारण पेट्रोल-डिझेलचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारत निश्चित होतात. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर कोणत्याही प्रकारचा निर्णय सरकार घेवू शकत नाही. पण सरकारकडे  यावर एक पर्यायी उपाय आहे. पेट्रोलच्या जागी एक असं इंधन येईल ज्याचे दर फार कमी असतील. तर या इंधनाचं नाव आहे इथेनॉल

येत्या 8 ते 10 दिवसांत केंद्र सरकार फ्लेक्स फ्यूल इंजिन वर मोठा निर्णय घेणार आहेत. ऑटोमोबाईल उद्योगासाठी अशी इंजिन अनिवार्य करण्यात येणार आहेत. फ्लेक्स फ्यूल म्हणजे  Flexible Fue. रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या म्हणण्यानुसार या पर्यायी इंधनाची किंमत 60 ते 62 रूपये प्रति लिटर असणार आहे. 

आता पेट्रोलचे दर 103 रूपयांवर गेल्यामुळे इथेनॉल उत्तम इंधन असल्याचं सांगितलं जात आहे. इथेनॉल इंधनाचा वापर केल्यास पेट्रोल ग्राहकांचे 30 ते 35 रूपये वाचणार आहेत. नितीन गडकरी म्हणाले, ‘मी परिवहन मंत्री आहे’  फक्त पेट्रोल इंजिन नाही तर फ्लेक्स-फ्यूल इंजिन तयार करण्याचे आदेश मी जारी केले आहेत. ज्यामुळे ग्राहकांपुढे आता दोन पर्याय असणार आहेत.