आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण

0
36

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना करोनाची लागण झाली आहे. ट्वीट द्वारे त्यांनी ही माहिती दिली असून संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.


ते म्हणाले ”माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या’, असे ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.