आयपीएलच्या उर्वरित सामान्यांना स्थगिती, बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांची माहिती 

0
17

आयपीएलवरही कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएलवर तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ही माहिती दिली. वृद्धिमन साहा आणि अमित मिश्रा हे दोन खेळाडूही कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे आयपीएल २०२१वर काही काळासाठी स्थगिती आणण्यात आली आहे.
आयपीएलच्या ३ वेगवेगळ्या फ्रंचायझींचे एकूण मिळून ४ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने बीसीसीआयने आयपीएल २०२१मध्ये तात्पुरती स्थगिती देण्याचे बीसीसआयने ठरवल्याची माहिती बीसीसाय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिली. रिपोर्टनुसार अमित मिश्राही कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. याआधी कोलकाता संघातील वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरीयर या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. तर वृद्धिमन साहालाही कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.काल एकाच दिवसात आयपीएलशी संबंधित 10 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आयोजकांच्या चिंता वाढल्या आहेत. याआधी गेल्या वर्षी 2020 मध्ये चेन्नईच्या सपोर्ट स्टाफमधील काही जणांना कोरोनाची लागण झाली होती.

Leave a Reply