आयपीएलच्या 14 व्या मोसमाचे वेळापत्रक जाहीर,9 एप्रिल पासून सुरवात 

0
37

मुंबई : बहुप्रतिशीत आयपीएलच्या 14 व्या सिजनचे वेळापत्रक जाहीर झालं आहे. या हंगामाची सुरुवात 9 एप्रिलपासून होणार आहे. याबाबद आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने ट्विट केले आहे. विशेष म्हणजे या मोसमाचं आयोजन भारतात आता करण्यात आलं आहे. या 14 व्या मोसमाची रंगत एकूण 51 दिवस रंगणार आहे. 9 एप्रिल ते 30 मे पर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. या मोसमातील सलामीचा सामना गत विजेच्या मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळवण्यात येणार आहे.14 व्या पर्वातील प्ले ऑफचे सामने हे जगातील सर्वात मोठं स्टेडियम असलेल्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत. हे सर्व सामने अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे पार पडणार आहेत.