आवाहना नंतरही प्रतिसाद नसल्यास राज्य सरकारला कठोर निर्णय घ्यावा लागेल -अजित पवार

0
25

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  जनतेला आवाहन करुनही प्रतिसाद मिळत नसेल तर राज्य सरकारला कठोर निर्णय घ्यावा लागेल, असं वक्तव्य पवार यांनी केले.
आपापली जबाबदारी लक्षात घेवून नियमांचे उल्लंघन न करता होळी साजरी करा.सध्याची परिस्थिती पाहता शांतपणे होळी साजरी करा. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेतील कोरोना रुग्णसंख्या अधिक आहे. सध्या कुटुंबच्या कुटुंब कोरोनाबाधित आढळत आहेत ही चिंतेची बाब आहे. प्रत्येकानं नियमांचे पालन केलं पाहिजे. प्रशासन प्रयत्न करतंय, त्यामध्ये जनतेनेही मनावर घेतलं पाहिजे, अशी अपेक्षा अजित पवार यांनी केली.