इंग्लंड दौऱ्यादरम्यान टीम इंडियाच्या आणखी एका खेळाडूला दुखापत

0
20


इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाच्या दुखापतींचं ग्रहण सुटत नाहीये. शुभमन गिल याच्यानंतर आता टीमचा फास्ट बॉलर आवेश खान याला दुखापत झाली आहे. डरहममध्ये भारताच्या सराव सामन्यामध्ये आवेश खानला दुखापत झाली. भारत आणि काऊंटी इलेव्हन यांच्यातल्या सामन्यात आवेश खानच्या अंगठ्याला दुखापत झाली, त्यामुळे तो मॅचमधून बाहेर झाला. आता इंग्लंड दौऱ्यालाही तो मुकणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आल्यामुळे काऊंटी टीमच्या खेळाडूंना आयसोलेशनमध्ये जावं लागलं, त्यामुळे आवेश खान या काऊंटी टीमकडून खेळायला उतरला.

आवेश खान इंग्लंड दौऱ्यावर राखीव खेळाडू म्हणून गेला आहे. दुखापतीमुळे तो 4 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या सीरिजमध्ये खेळू शकणार नाही, असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं आहे.