ईडी-सीबीआयची प्रताप सरनाईकांच्या लोणावळ्यातील रिसॉर्टवर धाड

0
32

मनी लाँड्रिंग प्रकरणात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या अडचणी आता आणखी वाढणार असल्याची चिन्ह आहेत. कारण हाती आलेल्या माहितीनुसार, प्रताप सरनाईक यांच्या लोणावळ्यातील एका रिसॉर्टवर ईडी आणि सीबीआयकडून छापा टाकण्यात आला आहे. सध्या ही कारवाई सुरू असून यामध्ये काय खुलासा होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रताप सरनाईक गायब असल्याचं एक ट्वीट केलं होतं. त्यानुसार सरनाईक यांना ताब्यात घेण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. खरंतर, याआधीही अनेक खुलासे समोर आले आहेत. त्यामुळे आता या कारवाईत नवीन काय माहिती मिळते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

असं पाहायला गेलं तर गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणात तपास थंड होता. अशात किरीट सोमय्यांनी ट्वीट केल्यामुळे पुन्हा खळबळ उडाली आहे. ईडी आणि सीबीआयकडून लोणावळा इथल्या एका रिसॉर्टवर छापा टाकण्यात आला आहे. तिथे सध्या चौकशी आणि तपास सुरू असून काही वेळातच यातून महत्त्वाची माहिती समोर येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या बातमीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.