ईस्टरनिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या शुभेच्छा

0
24

मुंबई : महाराष्ट्र व गोव्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी ईस्टरनिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.ईस्टर हा प्रभू येशू ख्रिस्तांच्या पुनरुत्थानाचा दिवस आहे. आज कोरोना संसर्गाच्या कठीण काळात येशू ख्रिस्तांचा मानवता, प्रेम, दया, क्षमा व त्यागाचा संदेश सर्वांकरिताच मार्गदर्शक आहे. ईस्टरनिमित्त सर्वांना, विशेषतः ख्रिश्चन बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो व कोरोनाविषयक खबरदारी पाळूनच हा पवित्र दिवस साजरा करण्याचे आवाहन करतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.