उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत ,आज घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

0
41

उत्तराखंडच्या नव्या मुख्यमंत्री पदावर भाजपचे गढवाल येथील खासदार तिरथ सिंह रावत बसणार आहेत. विधीमंडळ गटनेत्यांच्या बैठकीत रावत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. आज दुपारी 4 वाजता तीरथ सिंह रावत मुख्ममंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत कलह सुरू आहे. त्यामुळे त्रिवेंद्र सिंह रावत यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राज्यात नवा मुख्यमंत्री नियुक्त करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू होत्या.
आज डेहराडून येथे भाजपच्या विधीमंडळ गटनेत्यांची बैठक झाली. त्यात तीरथ सिंह रावत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याने उत्तराखंडमधील पेच सुटला आहे.मुख्यमंत्रीपदी नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर रावत यांनी मीडियाशी संवाद साधला. मी संघासाठी काम करत होतो. भाजपमध्ये येण्याचा कधीच विचार केला नव्हता. परंतु अटल बिहारी वाजपेयी यांच्यापासून प्रेरणा घेऊनच मी सक्रिय राजकारणात आलो, असं रावत म्हणाले