उत्तर भारतात भूकंपाचे तीव्र धक्के, 6.3 रिश्टर स्केल तीव्रता

0
39

उत्तर भारतात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले.नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार शुक्रवारी रात्री अफगाणिस्तानच्या फैजाबादजवळ रिश्टर स्केलवर 6.3 तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाचे केंद्रबिंदू अफगाणिस्तानच्या फैजाबादच्या 285 किलोमीटर पूर्व-ईशान्य दिशेला होते. भूकंप भारतीय वेळेनुसार रात्री 10:30 वाजता आला.हरियाणा, राजस्थान, जम्मू काश्मीर या भागात सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवले.यासह पाकिस्तान, चीन मध्ये सुद्धा भूकंपाचे हादरे जाणवले.