उद्यापासून बारामती,सातारा, सांगलीत कडक लॉकडाऊन 

0
18

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. कोरोना प्रादुर्भावाची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत राज्यात कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. परंतु काही जिल्ह्यात नागरिक नियमांचे पालन करत नसल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. बारामती, सांगली, सातारा आणि अहमदनगरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आणि कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे पुढील ७ दिवस अधिक कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामध्ये मेडिकल आणि दवाखाने वगळता सर्व दुकाने, अस्थापना बंद ठेवण्यात आल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि मृत्यूदर आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.

बारामतीमध्ये बुधवार ५ मे रोजी पासून हा लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. कोरोना नियमांचे नागरिक पालन करत नसल्याने जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. बारामतीमध्ये सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत दूध विक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे. तसेच मेडिकल आणि दवाखाने सोडून सर्व दुकाने आणि अस्थापना बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बाजारही या ७ दिवसांमध्ये बंद ठेवण्यात येणार आहेत. सांगलीमध्ये मेडिकल, दूध विक्रीवगळता इतर सर्व सेवा बंद ठेवण्यात आल्या तर सकाळी ११ वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Leave a Reply