एलजी कंपनीची स्मार्टफोन मार्केटमधून एक्झिट

0
23

एलजी या एकेकाळी स्मार्टफोन निर्मितीत आघाडीवर असणाऱ्या कंपनीने त्यांचा स्मार्टफोन निर्मिती विभाग बंद करणार असल्याचं जाहीर केलं आहे. गेले बरेच महीने त्यांच्या फोन्सना मिळणारा ग्राहकांचा प्रतिसाद कमी होत गेला आणि त्या कारणाने वाढत चाललेल्या तोट्यामुळे त्यांनी कंपनीची स्मार्टफोन निर्मिती पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर ते इलेक्ट्रिक वाहनांचे भाग, स्मार्ट होम उपकारणे, रोबॉट्स, AI, व्यवसायांसाठी साधने उपलब्ध करून देणाऱ्या सेवांवर लक्ष केंद्रित करणार आहेत.नव्या ग्राहकांच्या मागणीकडे पुरेसं लक्ष न दिल्यामुळेही असं झालेलं आहेच.
२०१३ मध्ये सॅमसंग व ॲपल नंतर LG जगातली तिसरी सर्वात मोठी फोन कंपनी होती. त्यानंतर गेली पाच सहा वर्ष त्यांचा हा विभाग तोट्यातच सुरू होता. परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करून पाहण्यात आले मात्र त्यांना काहीच यश मिळालं नाही. किंमती तुलनेने जास्त असल्यामुळे लोक चीनी फोन्सना प्राधान्य देत गेले आणि वरील कंपन्या मागे पडत गेल्या. गुणवत्तेने चांगले असलेले हे फोन्स आता यापुढे खरेदीसाठी उपलब्ध होणार नाहीत.