ऑलिम्पिकमध्ये 82 जणांना कोरोनाची लागण ,5 खेळाडूंची माघार 

0
19

टोकियो ऑलिम्पिक २०२१वर कोरोनाचे संकट सतत वाढत आहे. बुधवारी चिलीची तायक्वांदोपटू फर्नांडा एगुइरे आणि हॉलंडची स्केटबोर्डर केंडी जेकब्स, इंग्लंडची नेमबाज एंबर हिल, झेक गणराज्यची पॅडलर पावेल सिरुसेक आणि अमेरिकन बीच व्हाॅलीबॉलपटू टेलर क्रेब कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यानंतर खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला.

टोकियो स्पर्धेत प्रथमच असे घडले, जेव्हा एखादा खेळाडू कोरोनामुळे टोकियोत पोहोचल्यानंतर स्पर्धेतून माघार घेतली. फर्नांडाचे प्रशिक्षक जोस जापाटाची चाचणी निगेटिव्ह आली. तरीदेखील त्यांना क्वाॅरंटाइन करण्यात आले आहे. आतापर्यंत ९ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, ज्यात ३ खेळाडू क्रीडाग्राममध्ये सापडले. बुधवारीदेखील फर्नांडो व जेकब्ससह १० रुग्ण आढळले