केरळचे काँग्रेस नेते पी. सी. चाको यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

0
35


कॉंग्रेसचे माजी नेते पीसी चाको यांनी अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना चाको म्हणाले, ‘आज विरोधी पक्षामध्ये ऐक्य असण्याची गरज आहे. भाजपला पर्याय म्हणून संयुक्त विरोधी पक्ष उदयास आला पाहिजे. मी ज्या पक्षाचा पूर्वी सदस्य होते त्या पक्षामध्ये मला ही गोष्ट दिसून आली नाही.’ यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील उपस्थित होते.