कोरोनाची दुसरी लाट जवळपास 100 दिवस भारतात राहण्याचा दावा !

0
28

संपूर्ण देशात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. ही रुग्णवाढ पाहता देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याचं स्पष्ट होत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रिसर्च टीमने तयार केलेल्या अहवालात हा दावा करण्यात आला आहेत. कोरोनाची दुसरी लाट जवळपास 100 दिवस भारतात राहील. त्यामुळे 15 फेब्रुवारी ही तारीख गृहित धरली तर मे पर्यंत या लाटेचा परिणाम पाहायला मिळू शकते. या अहवालानुसार एप्रिल- मे मध्ये कोरोनाची दुसरी लाट जोरदार असणार आहे.सध्या रोज 34 लाख लोकांना लस दिली जात आहे. हा वेग 40 ते 45 लाखांवर घेऊन गेल्यास पुढील 3 ते 4 महिन्यात 45 वर्षांवरील सर्वांना लस टोचली जाऊ शकते. कोरोनाची दुसरी लाट वेळेपूर्वी आल्याचं ICMRचे डायरेक्टर जनरल बलराम भार्गव यांनी सांगितलंय. त्यामुळे आपल्याला अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. टेस्टची संख्या वाढवणे, मास्क वापरणे, सोबतच लसीकरण मोहीम लवकर पूर्ण करण्याची गरज ICMRकडून व्यक्त करण्यात आली आहे.