‘कोरोनाचे नियम मोडाल तर खबरदार, बीएमसीने केले ट्वीट

0
31

संपूर्ण जगात पसरलेल्या या कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यासाठी सरकारने अनेक ठिकाणी कडक निर्बंध लावले आहेत. असं असताना देखील बॉलिवूड अभिनेत्री गौहर खानने कोरोनाचे नियम मोडले आहेत, त्यामुळे तिच्या विरोधात मुंबई महानगरपालिकेनं तक्रार दाखल केली आहे.

गौहर खानचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असताना तिनं कोरोनाचे नियम मोडले आहेत. त्यामुळे महानगरपालिकेने तिच्या विरोधात अधिकृत तक्रार नोंदवली आहे. याबाबत त्यांनी एका ट्विटद्वारे माहिती दिली आहे.