कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव बघता राज्यात २८ मार्चपासून रात्रीची जमावबंदी लागू

0
26

महाराष्ट्रात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात रात्रीची जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता २८ मार्च म्हणजेच रविवारपासून रात्रीची जमावबंदी लागू होणार आहे. तसेच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, संसर्गाला रोखण्यासाठी कडक उपाययोजना लागू करुन त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने राज्यभरात रविवार, २८ मार्च २०२१ रात्रीपासून जमावबंदी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.