कोरोनाने दोन्ही पालक गमावलेल्या मुलांसाठी ‘जिल्हास्तरीय कृती दल’ स्थापन 

0
26

मुंबई: कोरोना काळात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना व बालकांचे संरक्षण करण्यासाठी राज्य सरकारने जिल्हास्तरावर टास्क फोर्स नेमण्याची सूचना केली आहे. शासन निर्णयास अनुसरून दि.१७ मे २०२१ रोजी मुंबई उपनगर जिल्ह्यात या कृती दलाची मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना करण्यात आली.

या बैठकी दरम्यान शोभा शेलार, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, मुंबई उपनगर सदस्य सचिव तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका व पोलीस आयुक्त यांचे प्रतिनिधी, अध्यक्ष, बाल कल्याण समिती मुंबई उपनगर-१ व २, श्री.विक्रमसिंग भंडारी, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व श्रीमती प्राजक्ता देसाई, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, मुंबई उपनगर उपस्थित होते. दरम्यान अशा बालकांची माहिती संकलन तसेच पुढील कार्यप्रणाली याबाबत चर्चा करण्यात आली व संबंधित यंत्रणेस जिल्हाधिकारी यांनी निर्देशित केले.