कोरोनामुळे मरण पावलेल्या मुंबई पोलिसांच्या कुटुंबियांना मिळतील प्रत्येकी ५० लाख

0
16

कोविड -19 मुळे मरण पावलेल्या ५० मुंबई पोलिसांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख मिळतील

सरकारने यासाठी एकूण २५ कोटी जाहीर केले आहेत

नेहमीच्या रेड टेपमध्ये हा निधी अडकणार नाही याची काळजी पोलिस खाते करणार असल्याचे वरिष्ठ आयपीएस अधिका अधिकाऱ्याने सांगितले.

राज्य सरकारने मंजूर केलेल्या निधी व्यतिरिक्त मुंबई पोलिसांनी प्रत्येक शहीद जवानांसाठी मुंबई पोलिस फाउंडेशन कडून १० लाख रुपये जाहीर केले आहेत.

१ ऑगस्टपर्यंत मुंबईतील ४,४४० पोलिसांना या विषाणूची लागण झाली असून त्यातील ५९ जणांचा बळी गेला आहे.