कोरोना परिस्थितीत मोठा दिलासा! इमरजन्सी हेल्थ सेवांसाठी RBI ने दिले 50,000 कोटी

0
18

कोरोनाचा हाहाकार दिसून येत आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे संपूर्ण देश आजरी पडण्याच्या स्थितीत आहे. अशा कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेत देशात मोठे संकट उभे राहिले आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज पत्रकार परिषदेत देशाला मोठा दिलासा देण्याच्या दृष्टीने अनेक घोषणा केल्या आहेत. कोरोना संकटांवर RBIची ‘आर्थिक व्हॅक्सिन’ चांगली लागू पडण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे बँकाना मोठा दिलासा मिळाला आहे.
500 कोटी रुपयांपर्यंतची मालमत्ता असलेल्या एमएफआयला (MFIs) प्राधान्य क्षेत्रातील कर्जात समाविष्ट केले जाईल. एसएलटीआरओ एसएफबीला (SFB) 3 वर्षांसाठी 10,000 कोटी रुपये देण्यात येतील. बँका कर्जाचे अधिग्रहण 2 वर्षांसाठी वाढवू शकतात. बँकांना एमएसएमई कर्जासाठी सूट मिळेल, बँकांना कोरोना कर्जात 0.4 टक्के रिव्हर्स रेपो सवलत मिळेल. 25 कोटी पर्यंतच्या कर्जात रिस्ट्रक्चरिंगची सुविधा आहे, त्यांना लाभ मिळेल, ज्यांनी अद्याप कर्ज रिस्ट्रक्चरिंग केलेली नाही.
20 मे रोजी 35,000 कोटी रुपयांचा आणखी एक जीएसएपी जाहीर केला जाईल. आपत्कालीन आरोग्य सेवेसाठी 50,000  कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. 3 वर्षासाठी 50,000 कोटी रुपयांची ऑन-टॅप लिक्विडिटी देईल. बँकांना कोरोना कर्ज पुस्तक बनविण्यास मान्यता मिळेल. तसेच प्राधान्य क्षेत्रासाठी लवकरच कर्ज व प्रोत्साहन दिले जाईल. 500 कोटी रुपयांपर्यंतची मालमत्ता असलेल्या एमएफआयला प्राधान्य क्षेत्रातील कर्जात समाविष्ट केले जाईल.  SLTRO एसएफबीला 3 वर्षांसाठी 10,000 कोटी रुपये देईल.

Leave a Reply