कोरोना लसीचा भासतोय तुटवडा! मुंबईतील 26 लसीकरण केंद्र बंद 

0
19

मुंबईसह राज्यात कोरोनाच संसर्ग वाढलेला असतानाच कोरोना लसीचा तुटवडाही भासत आहे. मुंबईतील 72 पैकी 26 खासगी व्हॅक्सीनसेंटरमधील लस संपल्याने या 26 ठिकाणचं लसीकरण बंद करण्यात आलं आहे. मुंबईतील सर्वात मोठं लसीकरण केंद्र असलेल्या बीकेसी कोविड सेंटरमध्येही लस संपल्याने या ठिकाणचंही लसीकरण बंद करण्यात आलं आहे.
राज्यात केवळ दोन दिवस पुरेल एवढ्याच लसी आहेत. मुंबईत लसीचा तुटवडा प्रचंड प्रमाणात निर्माण झाल्याने खासगी लसीकरण केंद्रांवरील लस देणं बंद करण्यात आलं आहे. मुंबईत एकूण 120 लसीकरण केंद्र आहेत. त्यापैीक 49 लसीकरण केंद्रे शासकीय आहेत. या केंद्रावर रोज 40 हजार ते 50 हजार लस दिल्या जातात. बुधवारी राज्यात 14 लाख डोस होत्या. अनेक जिल्ह्यात आज किंवा उद्या कोरोना लसीचा साठा संपेल. केंद्राला याबाबतची माहिती लिखित स्वरुपात दिली असल्याचं आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी सांगितलं.

Leave a Reply