कोलकाता विरुद्ध बंगळुरु सामना लांबणीवर, क्रिकेटपटूला कोरोना

0
19

आयपीएलच्या 14 व्या पर्वावर कोरोनाचं जोरदार वादळ घोंघावत आहे. आज स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु (KKR vs RCB) यांच्यात नियोजित सामना खेळला जाणार होता. मात्र कोलकात्याच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने हा सामना पुढे ढकलण्यात आला आहे. पीटीआयने हे वृत्त दिलं आहे. तथापि, कोलकाता आणि आयपीएलच्या अधिकृत निवेदनाची अद्यापपर्यंत कोणतंही स्टेटमेंट आलेलं नाहीय. दरम्यान आज आयपीएलची कोणतही मॅच खेळवली जाणार नाही.
संपूर्ण भारतात देशात कोरोनाने हाहाकार माजवलेला असताना अशा वातावरणात देखील आयपीएलची स्पर्धा सुरु आहे. संपूर्ण काळजी घेऊन ही स्पर्धी खेळविण्यात येतीय. याच पार्श्वभूमीवर स्पर्धी सुरु झाल्यापासून खेळाडू बायो बबल आहेत. दोन ते तीन दिवसांनंतर त्यांची कोरोना चाचणी केली जाते, त्यांचं हेल्थ चेकअप केलं जातं. आज चाचणी केली असता कोलकात्याचे वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर्स या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

Leave a Reply