कोविड रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा – आयुक्त डॉ. संजीव कुमार 

0
33

नागपूर: कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून, यापैकी ज्या रुग्णांना तात्काळ वैद्यकीय सुविधा तसेच ऑक्सिजनची आवश्यकता आहे. अशा रुग्णांसाठी शासकीय व खासगी रुग्णालयात ऑक्सिजन, बेड, मनुष्यबळ आदी सुविधा सज्ज ठेवण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आज दिले.
नागपूर जिल्ह्यासह विभागात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, एम्स, विविध खासगी वैद्यकीय महाविद्यालये तसेच खासगी रुग्णालयांत कोविड रुग्णांसाठी आवश्यक सर्व सुविधा सज्ज ठेवण्याच्या सूचना देताना विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार म्हणाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बेडची संख्या वाढवतानाच ऑक्सिजनसह बेड निर्माण करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी जिल्हा नियोजन व खनिज विकास निधीमधून 127 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या निधीमधून कोविड रुग्णांसाठी तात्काळ आवश्यक सुविधा पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी दिले.