खासदार देलकर यांच्या सुसाईड नोटमध्ये भाजपा नेत्यांची नावे?

0
34

दादरा-नगर हवेलीतून तब्बल सात वेळी खासदार असलेल्या मोहन देलकर यांच्या आत्महत्येनंतर आता राजकारणाला ऊत आला आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये अॅडमिनीस्ट्रेटर प्रफुल पटेल यांचे नाव समोर आले आहे. प्रफुल पटेल यांनी दिलेल्या त्रासामुळेच त्यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वर्तवला आहे. केंद्राकडून प्रफुल पटेल यांच्यावर कोणत्या प्रकरचा दबाव होता का? याची सखोल चौकशी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. गुजरातीत लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये मोठ्या नेत्यांची नावे आहेत. काही नेते त्यांचा वारंवार अपमान करत असल्याचे सुसाईड नोटमध्ये उल्लेख आहे.

दूसरीकडे काँग्रेसच्या शिष्टमंडळाने गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन भाजपा नेत्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

मोहन देलकर यांनी 2019 साली अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यांनी भाजपाच्या नथुभाई गोमनभाई पटेल यांनी 9 हजार मतांनी पराभूत करत सातव्यांदा लोकसभेत पोहोचले होते.