गुड फ्रायडे व ईस्टर सण्डे सण साधेपणाने साजरा करावा

0
32

मुंबई: ख्रिश्चन बांधवांचा गुड फ्रायडे हा दिवस यावर्षी २ एप्रिल २०२१ रोजी तसेच ईस्टर सन्डे ४ एप्रिल २०२१ रोजी साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी चर्चमध्ये विशेष प्रार्थनांचे आयोजन केले जाते. कोविड – १९ च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर सर्वधर्मीय सण साधेपणाने साजरे करण्यात आले आहेत. सध्या राज्यात तसेच मोठ्या शहरांमध्ये रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. कोविड – १९ चा प्रादुर्भाव अद्यापही असल्याने सर्वांनी मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊन उत्सव साजरा करणे योग्य होणार नाही. त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता २८ मार्च २०२१ ते ४ एप्रिल २०२१ या होली वीक दरम्यान येणारा “गुड फ्रायडे व ईस्टर सण्डे” हा सण साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन शासनाने केले आहे.