गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबाबद शरद पवार यांची मोठी प्रतिक्रिया

0
27

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्रामुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दरमहा 100 कोटी रुपये वसुलीचे गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित हाऊ लागले आहे. यामध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेतले आहे. यासर्व प्रकरणी शरद पवार यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली आहे. त्यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांना सैल करत उत्तरे दिली आहेत.ते म्हणाले ‘मी या प्रकरणी आतापर्यंत केवळ मुख्यमंत्र्यांशीच बोललो आहे. पक्षातील सहकाऱ्यांशी अजूनही चर्चा केली नाही.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=142668421008932&id=238463949663921

राजीनामा घेण्याचा अधिकार केवळ मुख्यमंत्र्यांचा आहे. त्यांनी आमच्याशी चर्चा केली नाही.’ तसेच अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावर शरद पवार यांनी त्यांची बाजू ऐकून घ्यावी लागेल. याबाबत सर्वांशी बोलून निर्णय घेऊ’असे स्पष्ट केले आहेत.