गृहमंत्र्यांचा राजीनामा घेत नाहीत तोपर्यत भाजपचे आंदोलन सुरुच राहणार- देवेंद्र फडणवीस 

0
29

मुंबई: पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं असा दावा परमबीर सिंग यांनी केला. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिलं आहे.
यावर भाजपने आज पासून आंदोलन सुरू केलं ते आंदोलन जो पर्यंत या प्रकरणाची चौकशी होत नाही आणि गृहमंत्र्यांच्या राजीनामा होत नाही तो पर्यंत सुरू राहील, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.तसेच ज्या गाड्या जप्त झाल्या त्या गाड्या कोण वापरत होते याची सुद्धा चौकशी केली पाहिजे असेही ते म्हणाले.