गोव्याच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची एन्ट्री, 20-25 जागांवर लढणार निवडणूक

0
27

गोवा: शिवसेनेने गोवा विधानसभा निवडणुकीकडे आपला मोर्चा वळवला आहे. नुकताच पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना शिवसेनेने पाठिंबा दर्शविला आहे.गोव्यात शिवसेना 20 ते 25 जागांवर निवडणूक लढणार असल्याची घोषणा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. त्यामुळे गोव्यात भाजपची कोंडी होणार असल्याचं दिसून येत आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. गोव्यात शिवसेना लढणार आहे. आम्ही गोव्यातील 20 ते 25 जागांवर लढणार आहे, असं राऊत यांनी आज स्पष्ट केलं. स्वबळावर लढल्याने पक्षाचा विस्तार होईल, असंही त्यांनी सांगितलं.