चंद्रपूर अन जळगावातील शासकीय रुग्णालय उभारणीच्या कार्यवाहीस गती द्या- अमित देशमुख

0
23

मुंबई: चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासंदर्भात कराराप्रमाणे दिलेल्या सवलतीच्या कालावधीतच काम पूर्ण करावे. याचबरोबर जळगाव येथील शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे काम नियमानुसार उपलब्ध निधीत पूर्ण करावयाच्या कार्यवाहीस गती द्यावी. संबंधित कामाचा अहवाल तात्काळ सादर करावा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले.
मंत्रालयात चंद्रपूर आणि जळगाव येथील शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देशमुख म्हणाले, चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम केंद्र शासनाने दिलेल्या सवलतीच्या कालावधीतच पूर्ण करावे. याचबरोबर जळगाव येथील रुग्णालयासाठीच्या जमिनीची पाहणी करून संबंधित कामाचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देशही मंत्री देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.