चार तरुणांशी लग्न करून फसवणूक करणारी नवरी पोलिसांच्या ताब्यात

0
26

फसवणुकीचा अनेक घटना आपल्या आजूबाजूला नेहमीच घडत असतात मात्र वेगवेगळ्या तरुणांशी गरिबीच्या नावाने लग्न करून त्यांच्याकडून पैसे व दागिने घेऊन नवविवाहित वराची फसवणूक झाल्याचा प्रकार भिवंडीत समोर आला आहे. गरिबीच्या नावाने लग्न करून तरुणांना लुटल्याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी भामट्या तारुणीसह तिच्या आईला व त्यांची आणखी एक महिला साथीदार अशा तीन महिलांना शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे. 
रिना देवरे वय 23 वर्ष असे गरिबीच्या नावाने लग्न करून तरुणांना लुटणाऱ्या तरुणीचे नाव आहे. आई मंगला देवरे व मावशी सुनीता संजय माहिरे यांच्या मदतीने घरची परिस्थिती खूप गरीब आहे अशी खोटी माहिती सांगून रिना हिचे लग्न लावत असत. मात्र लग्न झाल्यानंतर रीना आपल्या पतीला वेगवेगळी खोटी कारणे सांगून पळून जायची जातांना लग्नात नवरदेवाने दिलेले पैसे व दागिने घेऊन पळून जायची. वेगवेगळ्या ठिकाणचा खोटा पत्ता त्या प्रत्येकवेळी नवनवीन नवऱ्यांना देत असल्याने तिचा पत्ता देखील कोणाला सापडत नव्हता.मात्र एकाला आपली फसवणूक झाल्याचे समजताच शांती नगर पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात  तक्रार दाखल केली व शांतीनगर पोलिसांनी रिना देवरे , तिची आई मंगला देवरे व मावशी सुनीता माहिरे यांना ताब्यात घेतले असता फसवणुकीचा सर्व प्रकार समोर आला. या फसवणूक प्रकरणी या तिघी महिलांविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तिघींना देखील अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.