जसप्रीत बुमराहने स्टार अँकरसोबत बांधली लगीनगाठ

0
41

टीम इंडियाचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह विवाहबद्ध झाला आहे. बुमराह प्रसिद्ध क्रीडा निवेदिका संजना गणेशनसोबत लग्नबेडीत अडकला आहे. हा विवाहसोहळा गोव्यात पार पडला आहे. लग्नासाठी संजना गणेशन आणि आणि दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन यांच नाव चर्चेत होतं. पण अखेर बुमराह संजनासोबत लगीनगाठ बांधली आहे. यामुळे आता सर्व प्रश्नांना पूर्णविराम मिळाला आहे. आता बुमराहच्या जीवनातील नव्या इनिंगला सुरुवात झाली आहे. बुमराहने विवाहासाठी इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी आणि टी 20 मालिकेतून माघार घेतली होती.विवाहादरम्यान या दोघांनी आपले फोटो व्हायरल होणार नाही, याची पुरेपुर काळजी घेतली. मात्र त्यानंतरही या दोघांचे लग्नाचे फोटो व्हायरल झाले आहेत.