जेष्ठ आई वडिलांच्या देखभालीसाठी मुलांना द्यावे लागणार 10 हजार, संसदेत विधेयक मांडणार

0
19


देशभरातील ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केला आहे. ज्येष्ठांची घरात होत असलेली अवहेलना लक्षात घेऊन त्यांच्यासाठीच्या कायद्यात काही सुधारणा करण्याचा सरकारने प्रयत्न केला आहे. याबाबतचं विधेयक 2019 मध्येच संसदेत मांडलं होतं त्यावर आता सुरु असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात निर्णय होण्याची शक्यता आहे. हे विधेयक मंजूर झालं तर आई-वडील आणि ज्येष्ठ नागरिकांच्या देखभालीसाठी मुलांना 10 हजार रुपये द्यावे लागणार आहेत. या विधेयकाबद्दलच आपण अधिक माहिती जाणून घेऊया.

मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पेरेंट्स अँड सीनिअर सिटिझन्स (सुधारणा) विधेयक 2019 असं या विधेयकाचं पूर्ण नाव असून ते सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात संसदेत मंजूर केलं जाऊ शकतं