ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला जावळकर यांचं निधन 

0
21

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला जावळकर यांचं आज निधन झालं. त्या ८८ वर्षांचं होत्या. फिल्मफेअरचे संपादक जितेश पिल्लई यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही दु:खत बातमी शेअर केली आहे. आज ४ एप्रिल २०२१ रोजी दुपारी १२ वाजता शशिकला यांनी अखेरचा श्वास घेतला.७० व्या दशकात त्यांनी मुख्य अभिनेत्री आणि खलनायिका अशा दोन्ही प्रकारच्या भूमिका त्यांनी साकारल्या होत्या.त्यांनी तब्बल १०० चित्रपटांमध्ये काम केलं.
शशिकला यांचं पूर्ण नाव शशिकला जावळकर असं होतं. त्यांचा जन्म ४ ऑगस्ट १९३२ रोजी सोलापुरात झाला होता. शशिकला यांच्या जिवनात अनेक चढाव-उतार आले. असं असलं तरी त्यांचं बालपण मात्र सुखवस्तू घरात गेलं होतं. त्यांचे वडिल मोठे उद्योगपती होते. शशिकला यांना एकूण सहा भावंडं होती.