टुरिंग टॉकीजला ‘या’ करातून सूट मिळण्यासाठी वित्त विभागाकडे पाठपुरावा करणार- अमित देशमुख 

0
24

सिनेमा गावागावात पोहोचविण्यात महत्त्वाचा वाटा टुरिंग टॉकीजचा आहे. लॉकडाऊननंतर टुरिंग टॉकीज मालकांचे मोठे नुकसान झाले असल्याने टुरिंग टॉकीजला वस्तू व सेवा करातून सूट मिळावी यासाठी वित्त विभागाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.राज्यातील टुरिंग टॉकीजच्या प्रश्नांसदर्भातील बैठक सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती.  देशमुख म्हणाले, आज राज्यभरात जवळपास 50 हून अधिक टुरिंग टॉकीज सुरु असून यामध्ये 90 टक्के मराठी आणि 10 टक्के हिंदी सिनेमे दाखविण्यात येतात.या क्षेत्राला बळकटी देण्याबरोबरच टुरिंग टॉकीज मालकांना सांस्कृतिक कार्य विभागामार्फत नव्याने कोणती योजना लागू करता येईल याचा अभ्यास केला जावा, असे निर्देशही देशमुख यांनी दिले.