टूलकिट केस प्रकरणात अटकेत असलेल्या पर्यावरणवादी दिशा रविला अखेर जामीन मंजूर झाला आहे. एक लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. दूसरीकडे दिल्ली पोलीस सायबर सेलच्या ऑफिसमध्ये निकिता जॅकब, शांतनु आणि दिशा रवि यांची समोरासमोर बसून चौकशी करत आहे. सोमवारीही निकिता आणि शांतनू यांची जवळपास 5 तास चौकशी केली होती. पोलिसांनी दिशा रविची कोठडी वाढवून देण्याची मागणी केली होती. त्यावर पोलिसांनी एक दिवसाची पोलीस कोठडी वाढवली होती. आज कोठडी संपल्यानंतर पटियाला हाऊस कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.
दिशा रविने आपल्यावरील सर्व आरोपांसाठी शांतनु आणि निकिता यांना जबाबदार धरलं आहे. यासाठी तिघांची एकत्र चौकशी करण्यात आली. पोलिसांनी झुम मिटींगची तसेच टूलकिट प्रकरणाबाबत कोर्टात माहिती दिली