ठाण्यात मनसे नेत्याची हत्या करणारा शूटर पोलिसांच्या अटकेत, मुख्य आरोपी फरार

0
22

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि माहिती अधिकार कार्यकर्ते जमिल अहमद शेख यांच्या हत्येचा खुलासा यूपी एसटीएफने केला आहे. एसटीएफने आरोपी शुटर इरफानला लखनौमधील कठौता तलावाजवळून अटक केली आहे.ठाणे येथे 23 नोव्हेंबर 2020 रोजी मनसे नेत्याची हत्या करण्यात आली होती. आरोपी इरफान सोनू हा गोरखपूर जिल्ह्यातील गुलरीहाच्या खीरियाचा रहिवासी आहे. शनिवारी दुपारी लखनऊमध्ये यूपी एसटीएफने त्याला अटक केली. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या उपायुक्तांमार्फत उत्तर प्रदेश एसटीएफच्या महासंचालकांना अटकेसाठी विनंती करण्यात आली होती. मनसे नेत्याची हत्या केल्यानंतर इरफान उर्फ ​​सोनूने गोरखपूरमध्ये लपून बसला होता. आरोपी लखनौमध्ये असल्याची माहिती यूपी एसटीएफला मिळाल्यानंतर सापळा लावून एसटीएफने त्याला अटक केली.
यूपी पोलिसांच्या प्रेसनोटमध्ये ठाणे महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे नेते (नगरसेवक) असलेले नजीबुल्लाह यांच्या आदेशानुसार ही हत्या करण्यात आली असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे या अटकेनंतर महाराष्ट्रात चांगलेच राजकारण तापण्याची शक्यता आहे.