दिल्लीत पुन्हा शेतकऱ्यांचे आंदोलन,9 ऑगस्टपर्यंत शेतकरी उठवणार आवाज

0
19

दिल्लीत आजपासून शेतकरी आंदोलन करणार आहे. केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी हे आंदोलन करत आहेत. या शेतकऱ्यांना दिल्लीतल्या जंतर- मंतरवर आंदोलनासाठी परवानगी मिळाली आहे. त्यानुसार शेतकरी आजपासून म्हणजेच 22 जुलैपासून 9 ऑगस्टपर्यंत आंदोलन करतील.आंदोलनासाठी वेळही देण्यात आली आहे. सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही वेळ असेल. काही अटींवर दिल्ली आपत्ती व्यवस्थापनानं शेतकऱ्यांना आंदोलनासाठी परवानगी दिली आहे.आंदोलनासाठी दिलेल्या परवानगीनुसार दिल्लीत जंतर- मंतरवर रोज 200 शेतकऱ्यांना आंदोलन करता येईल. तसंच कोरोना नियमांचं पालन करणं गरजेचं आहे.