दिल्ली विमानतळावरील अजय देवगणला मारहाणीचा ‘तो’ व्हायरल व्हिडिओ फेक

0
17

बॉलिवूडचा सिंघम अभिनेता अजय देवगणला कथित मारहाणीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत मारहाण होत असलेली व्यक्ती अजय देवगण नाहीअसं अजयच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे.या  व्हिडीओमध्ये मारहाण होत असलेल्या व्यक्तीचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. मात्र हा व्हिडीओ व्हायरल करत हा व्यक्ती अजय देवगण असल्याचं सांगितलं गेलं. हा व्हिडीओ खोटा आणि अफवा पसरवणारा असल्याचं त्यांनी सांगितलं 
अजय देवगणच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, दिल्लीतील एका पबच्या बाहेरील एका भांडणाचा व्हिडीओ आला आहे. त्यात अजय देवगण असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र हे खोटं आहे.

अजय देवगण यावेळी  ‘मैदान’ ‘मेडे’ आणि ‘गंगूबाई काठियावाड़ी’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मागील 14 महिन्यांपासून अज देवगणनं दिल्लीत पाऊल देखील ठेवलेलं नाही, असं सांगण्यात आलं आहे.  प्रवक्त्यांनी सांगितलं की, अजय देवगण आपल्या जबाबदार वर्तणूक आणि सामाजित शिष्टाचारासाठी ओळखले जातात.