दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण: दीपाली चव्हाण अन डीएफओ शिवकुमार यांच्यातील संभाषणाची क्लिप व्हायरल..

0
25

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील महिला वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. यांच्या आत्महत्या प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत आहे. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर चार पानी सुसाइड नोट सापडली होती. त्यात विनोद शिवकुमार यांनी प्रचंड मानसिक त्रास दिल्याचा उल्लेख असल्याने पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सध्या पोलीस कोठडीत आहे. आता दीपाली चव्हाण आणि शिवकुमार यांच्या मोबाइलवरील संभाषणाची कथित क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात शिवकुमार हा दीपाली यांना अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची शिफारस करण्याची धमकी देत असताना ऐकायला मिळत आहे. इतकेच नाही तर, तू अजिबातच वाचणार नाहीस, असेही बोलत असल्याचे ऐकायला मिळते.
शिवकुमार आपल्याच वनविभागाच्या महिला अधिकाऱ्यांसोबत कसे एकेरी भाषेत बोलतात ते स्पष्ट होत आहे. शिवाय या क्लिपमध्ये शिवकुमार हे बोलताना मान मर्यादा आणि महिलांशी कसं बोलायचं याचं सुद्धा भान नाही. आपली ज्यूनियर अधिकारी आहे म्हणून कसेही बोलायचं पातळी सोडून बोलायचं आणि यामध्ये दीपाली चव्हाण या महिला अधिकाऱ्यांनी जे सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे, त्याचं संपूर्ण संभाषण या ऑडिओ क्लिप मध्ये आहे. शिवाय या क्लिपमध्ये दोघांच्या संवादात खासदार नवनीत राणा, आमदार रवि राणा यांचा देखील उल्लेख आहे. संपूर्ण कॉलमध्ये दीपाली चव्हाण या अत्यंत नम्र भाषेत बोलताना दिसत आहेत  तर शिवकुमार मात्र अत्यंत उर्मट भाषेत बोलत आहेत.