दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण: उपवनसंरक्षक शिवकुमारला पोलीस कोठडी 

0
22

मेळघाटातील बहुचर्चित दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यास न्यायमूर्ती एम. एस. गाडे यांच्या न्यायालयाने २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याला धारणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या हरिसाल येथील आरएफओ दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विनोद शिवकुमार हा रातोरात मेळघाटातून फरार झाला होता. मात्र अमरावतीच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून त्याला मोठ्या शिताफिने २६ मार्चला नागपूर रेल्वे स्थानकातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यास अमरावती येथे आणून लगेच कालच सायंकाळी धारणी पोलिसांच्या ताब्यात दिले होते. धारणी पोलिसांनी त्याचे जबाब नोंदवून वैद्यकीय तपासणीनंतर अटक केली होती.
धारणी पोलिसांनी आज, आरोपी विनोद शिवकुमार याला दिवाणी न्यायालयाचे प्रथम क्षेणी न्यायाधीश एम. एस. गाडे यांच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले. 

Photo: randeep hooda