देशात कोरोना 24 तासांत 41 हजार नव्या रुग्णांची नोंद, 507 रुग्णांचा मृत्यू

0
19

कोरोनाचा कहर अद्याप सुरुच आहे. पुन्हा एकदा 40 हजारांहून अधिक नव्या कोरोना बाधितांनी करण्यात आली आहे. गुरुवारी आरोग्यमंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 41383 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 507 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी बुधवारी 42,015 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली होती. गेल्या 24 तासांत 38,652 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाबाधितांची सक्रिय रुग्णसंख्या चार लाखांहून अधिक आहे. एकूण 4 लाख 9 हजार लोकांना सध्या कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. महामारीच्या सुरुवातीपासूनच आतापर्यंत तीन कोटी 12 लाख 57 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.