देशात पहिल्यांदा एका दिवसात आढळले दोन लाखांहून अधिक रुग्ण 

0
28

भारतात करोना संक्रमणाचा वेग पुन्हा एकदा धडाक्यानं वाढलाय. करोना संक्रमणाचे आकडे दररोज एक नवा उच्चांक गाठत नवनवीन रेकॉर्ड कायम करताना दिसतोय. बुधवारी भारतात पहिल्यांदाच दोन लाखांहून रुग्ण आढळले आहेत. २४ तासांत करोनाबाधित एकूण २ लाख ७३९ रुग्णांची भर पडलीय. भारतात कोरोना दाखल झाल्यापासूनचा हा देशातील एका दिवसाचा सर्वात मोठा आकडा ठरलाय. याच २४ तासांत १ हजार ०३८ करोनाबाधित रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत.
देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १ कोटी ४० लाख ७४ हजार ५६४ वर पोहचलीय. तर आतापर्यंत देशात एकूण १ लाख ७३ हजार १२३ नागरिकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. सध्या देशात १४ लाख ७१ हजार ८७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.आयसीएमआर (ICMR)नं दिलेल्या माहितीनुसार, १४ एप्रिल रोजी देशात १३ लाख ८४ हजार ५४९ नमुन्यांची करोना तपासणी करण्यात आली. तर देशात आतापर्यंत एकूण २६ कोटी २० लाख ०३ हजार ४१५ नमुन्यांची तपासणी करण्यात आलीय.